
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे पंतप्रधानपद भूषवले आहे. तसेच त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कार्याकाळाची बरोबरी केली आहे. त्यानंतर सोशल मिडीयावर पंडित नेहरू आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना होत आहे. त्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
पंतप्रधान मोदींनी जवाहरलाल नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाशी बरोबरी केली. पंतप्रधान मोदींना सत्तेवर येऊन केवळ १२ वर्षे झाली आहेत. मात्र, पंडित नेहरूंशी बोरबरी करण्यासाठी मोदींना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. तिथे पोहोचण्यासाठी पंतप्रधान मोदींना अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.
पाकिस्तान-व्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये (PoK) सुरू असलेल्या हिंसाचारावर आणि राजकीय अनिश्चिततेवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या अस्थिरतेमुळे लोकांचा जीव जात असल्याचे त्यांनी सांगितले. अब्दुल्ला यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीला तातडीने परिस्थिती हाताळण्याचे आणि PoK मधील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
माजी मुख्यमंत्री म्हणाले, तिथे मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू आहे. तिथे अनेक लोक शहीद झाले आहेत. मी संयुक्त राष्ट्रांना आवाहन करतो की त्यांनी तिथे जाऊन लोकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हे पाहावे, जेणेकरून आम्हाला आणि संपूर्ण जगाला ते कळेल. त्यामुळे, मी संयुक्त राष्ट्रांना तिथे जाऊन चौकशी करण्याची विनंती करत आहे, असे ते म्हणाले.
जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती अस्थिर असल्याचे सांगून त्यांनी या प्रदेशाचा एक राज्य म्हणून असलेला सन्मान आणि प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. सत्ता विभागलेली आहे आणि आम्ही कठीण परिस्थितीत काम करत आहोत. सामान्य परिस्थितीत, शासन हे निवडून आलेल्या सरकारच्या हातात असायला हवे होते, नायब राज्यपालांच्या कार्यालयाच्या नाही, असेही ते म्हणाले. आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळवून देण्यासाठी आधीपासूनच लढत आहोत आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.



























































