
पावसाला सुरुवात होण्यापूर्वी एका पुंडीतली माती थोडी वर-खाली करून घ्या. यामुळे रोपांच्या मुळांना ऑक्सिजन चांगला मिळतो. कारण त्यानंतर पावसामुळे माती नेहमीच ओलसर राहाते आणि मुळांपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचत नाही.
पुंडीतल्या मातीमध्ये जमा झालेली पाने, काडय़ा, अन्य कचरा साफ करून घ्या. काही रोपांची जागा बदलणं गरजेचे असते. कारण काही रोपांना खूप जास्त पाणीही नको असते. पुंडय़ांमधून पाण्याचा योग्य निचरा होतो की नाही हे तपासा.


























































