
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात अघरमा येथे रांचीहून सिमडेगाकडे जात असताना हा अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला एका झाडावर आदळली. यात एक महिला, एक पुरुष आणि तीन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गुलाम मुस्तफा (58), गुलशन आरा (48), अनाबिया परवीन (3), आयरा नाझ (18 महिने) आणि मोहम्मद अर्श हाशमी (8) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.


























































