कॅनरा बँक, बडोदा बँकेचे कर्ज महागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदाने आपल्या एमसीएलआर दरांमध्ये वाढ केली असून नवीन दर 12 जूनपासून लागू होणार आहेत. बँकांच्या या निर्णयामुळे ग्राहकांचे गृहकर्ज, कार कर्ज आणि इतर व्यावसायिक कर्जे महाग होण्याची शक्यता आहे. दोन्ही बँकांनी एमसीएलआर दरांत 5 बेसिस पॉइंट्सची वाढ केली.