
प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या मालकीच्या ‘24एचएस फिटनेस’ या जिम फ्रँचायझीवर बुधवारी रात्री उशिरा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सलमान खानसोबत जवळीक वाढवल्यामुळेच गुरू रंधावाला टार्गेट केल्याचा दावा बिश्नोई गँगने केला.


























































