
इन्स्टाग्रामवरील मैत्रिणीच्या अकाउंटवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना चितळसर परिसरात घडली. यात १९ वर्षीय साहिल पांचाळ या तरुणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला तर त्याचा अल्पवयीन भाऊ गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तिघांना बेड्या ठोकल्या.
आरोपी चिन्मय डोंगरे याने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून साहिलची मैत्रीण तनिष्काला मेसेज व लाईक्स करून त्रास दिला होता. याचा जाब विचारण्यासाठी साहिलने चिन्मयला बोलावले होते. चिन्मयसह गुण्णाळ डोंगरे आणि विवेक राजे हे देखील त्याठिकाणी आले.
इन्स्टाग्रामवर मेसेज का करतोस असा जाब साहिलने विचारला असता गुण्णाळने साहिलच्या छातीवर चाकूने वार केले. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या ओमकार पांचाळ याच्यावरही त्याने हल्ला केला.




























































