टाटा मोटर्सच्या कार १ जुलैपासून महागणार; पेट्रोल-डिझेलसह EV गाड्यांचाही समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tata-motors-to-increase-car-prices-by-1-5-percent-from-july-1-ev-petrol-diesel-models-included

महागाईच्या कचाट्यातून जनतेची सुटका होण्याची चिन्हे दिसत नसून विविध उत्पादने, सेवा दिवसेंदिवस ग्राहकांच्या खिशावरील बोजा वाढवत आहेत. आता कार महागणार असल्याचे वृत्त आले आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडने शुक्रवारी सांगितले की, ते १ जुलैपासून त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमतींमध्ये दीड टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहेत. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे.

‘उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि सततच्या महागाईचा दबाव यामुळे निर्माण झालेला वाढीव खर्च अंशतः भरून काढण्यासाठी ही दर वाढ केली जात आहे’, असे कंपनीने रेग्युलेटरी फाईलिंगमध्ये म्हटले आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स या वाढलेल्या खर्चाचा मोठा बोजा स्वतः सहन करत असले, तरी या दरवाढीच्या माध्यमातून खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकला जात आहे, असे कंपनीने नमूद केले.

टाटा मोटर्सच्या कारची दर वाढ कशी असणार?

‘दर वाढीचे हे प्रमाण वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंट्सनुसार वेगवेगळे असेल, ज्यामुळे प्रत्येक वाहनाचे एकूण मूल्य आणि ग्राहकांसाठीची उपयुक्तता कायम राहील याची काळजी घेतली जाईल’, असेही कंपनीने पुढे स्पष्ट केले आहे.