
बेस्ट बससेवेच्या संपापाठोपाठ एसटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी आंदोलनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. एसटी कामगारांच्या आंदोलनाचा संपूर्ण राज्याला फटका बसू शकते, या चिंतेने महायुती सरकारची चिंता चांगलीच वाढली असून आंदोलनाआधीच कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी सोमवारी मंत्रालयात बैठक बोलावली आहे.
महायुती सरकारच्या काळात एसटी कामगारांचा आर्थिक प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. विविध प्रश्न सोडवण्याबाबत महायुती सरकार केवळ पोकळ आश्वासने देत असल्याने एसटी कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातून महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने तीन टप्प्यांत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. 29 जूनपासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.





























































