
ऑस्ट्रेलियात एका हिंदुस्थानी आजोबांनी तब्बल 18 हजार फूट उंचीवरून स्कायडायविंग करून लोकांचे मन जिंकले. हातात तिरंगा ध्वज घेत आपल्या नातवासोबत आजोबांनी 18 हजार फूट उंचीवरून उडी मारण्याआधी ‘जय हिंद’, ‘जय भारत’ अशा घोषणा दिल्या. हे आजोबा हरियाणातील आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

























































