एनसीईआरटीने नववीच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना हटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीईआरटीने नववीच्या सामाजिक विज्ञानच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना काढून टाकली आहे. याशिवाय सोशलिस्ट (समाजवादी) आणि सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) या शब्दांचाही उल्लेख नाही, यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पुस्तकात सार्वभौम (संप्रभुता), ‘समाजवादी’ (समाजवादी), ‘धर्मनिरपेक्ष’ (पंथनिरपेक्ष/धर्मनिरपेक्ष), ‘लोकशाही’ (लोकतांत्रिक) आणि ‘गणराज्य’ (गणराज्य) यांसारख्या शब्दांबद्दल माहिती दिलेली नाही. इयत्ता 9 वीच्या सामाजिक विज्ञान पुस्तकात देशाच्या निवडणूक आयोगाचेदेखील काwतुक केले आहे. भारतात निवडणुका घेणे हे जगातील सर्वात मोठय़ा कामांपैकी एक आहे. तरीही, निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका घेण्याचा प्रयत्न करतो, असे या पुस्तकात म्हटले आहे. फेक न्यूज (बनावट बातम्या), चुकीची माहिती पसरवणे आणि मतदारांना धमकावणे यांसारख्या समस्यादेखील समोर येतात. यावर मात करण्यासाठी निवडणूक आयोग आरपीए कायदा, आदर्श आचारसंहिता, ईव्हीएम, व्हीव्हीपीएटी आणि मतदार जनजागृती मोहिमांचा वापर करतो, असेही या पुस्तकात म्हटले आहे. विद्यार्थ्यांना 1977 ते 2014 पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या युतींचा अभ्यास करण्यासही सांगितले आहे.