
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सेशेल्सच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्यात ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच या दौऱ्यात मोदींची सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील होणार आहे.
Leaving for Seychelles, where I will take part in their National Day celebrations. This year, it is even more special because it is the Golden Jubilee celebrations.
Seychelles is a valued maritime neighbour and a key partner in our Vision MAHASAGAR, as well as in advancing the…
— Narendra Modi (@narendramodi) June 27, 2026
आपल्या सेशेल्सला निघण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, सेशेल्स हा आपल्या देशाच्या शेजारी असलेला महत्त्वाचा देश असून ‘व्हिजन महासागर’ (Vision MAHASAGAR) आणि ‘ग्लोबल साउथ’ (Global South) प्रती हिंदुस्थानच्या बांधिलकीचा एक प्रमुख भागीदार आहे. दीर्घकालीन मैत्री आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेसाठी आपण उत्सुक असल्याचेही मोदी यांनी सांगितले. “आम्ही मिळून आमच्या जनतेच्या प्रगतीसाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा आणि समृद्धी वाढवण्यासाठी काम करू,” असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी सांगितले की, सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून ते २७ ते २९ जून दरम्यान हा अधिकृत दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात ‘सन्माननीय अतिथी’ (Guest of Honour) म्हणून सहभागी होतील.


























































