
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेल्या गद्दार खासदारांची युवासेनेचे सचिन पाटील यांनी नांदेड शहरातून गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडून आलेल्या सहा खासदारांनी पक्षाशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्याशी हात मिळवणी केली. ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले त्या पक्षाशी गद्दारी करणाऱ्या या खासदारांची शहरातील प्रमुख मार्गावरून युवासेनेचे सचिन पाटील यांनी गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी गद्दारी करून शिंदे गटात सामील झालेल्या गद्दार खासदारांची युवासेनेचे सचिन पाटील यांनी नांदेड शहरातून गाढवावरून प्रतीकात्मक धिंड काढली. pic.twitter.com/b6iGciVNAB
— Saamana Online (@SaamanaOnline) June 28, 2026
अगोद राजीनामा द्या, नंतरच पक्ष बदला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, गद्दार खासदारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शहरातून ही धिंड काढण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी अशोक पावडे, गणेश पेन्सिलवार, सौरभ देवकदे आदी उपस्थित होते.




























































