
शेतकरी कर्जमाफी ही फसवी घोषणा असून शेतकऱ्यांमध्ये याबद्दल तीव्र संताप आहे, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “भाजपा महायुती सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा फसवी आहे, हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. सरकारने घोषणा केली पण अद्याप कर्जमाफी केलेली नाही, त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस व मित्रपक्ष आंदोलन करत आहेत. सरकार चर्चेला बोलावते पण चर्चाच करत नाही. भाजपा महायुती सरकार हे शेतकरी विरोधी आहे.”





























































