
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या फॅशन सेन्सची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगत असते. नुकतीच तिने तिची जवळची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर आणि दिग्दर्शक शरण शर्मा यांच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.

या खास प्रसंगी जान्हवीने परिधान केलेल्या पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा मेळ घालणाऱ्या लेहेंग्याने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या लग्नसोहळ्यासाठी जान्हवीने काळ्या आणि लाल रंगाचा अत्यंत देखणा लेहेंगा परिधान केला होता. प्रसिद्ध डिझायनर जोडी रिमपले आणि हरप्रीत यांनी हा लेहेंगा डिझाइन केला आहे.

या गडद काळ्या रंगाच्या लेहेंग्यावर 18 व्या शतकातील मिनिएचर पेंटिंग्ज, मुघलकालीन कलाकुसर आणि व्हिक्टोरियन दागिन्यांच्या डिझाइन्सवरून प्रेरित होऊन फुलांचे आणि पक्ष्यांचे नक्षीकाम करण्यात आले आहे.

लेहेंग्याच्या चोळीवर पारंपरिक मरोडी प्रकारातील भूमितीय आणि फुलांचे क्लिष्ट नक्षीकाम करण्यात आले आहे. एका बाहीवर केलेले रेशम काकाव भरतकाम या पोषाखाला अधिकच राजेशाही लूक देते. याशिवाय ब्लाउजच्या काठावर मण्यांचे डिझाइन आणि पाठीवर असलेल्या दोरीने या गाऊनला अधिक ग्लॅमरस बनवले आहे.

या लूकला परिपूर्ण करण्यासाठी जान्हवीने हेरिटेज पद्धतीचे दागिने निवडले होते. तिने कानात अँटिक सोन्याचे झुमके, हातात भरगच्च बांगड्या, ब्रेसलेट, हाथफूल आणि नाकात एक नाजूक नथ घातली होती.

जान्हवीने इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. स्वतःला वचन दिलं होतं की फक्त एकच झलक दाखवेन, पण हा कॉम्बो?????? असे कॅप्शन जान्वहीने दिले आहे. हलका मेकअप, न्यूड ग्लॉसी लिप्स, कपाळावर छोटी लाल टिकली आणि मोकळे सोडलेले केस यामुळे तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.




























































