
कर्नाटकचे परिवहन मंत्री बायरथी सुरेश यांनी शनिवारी रात्री बंगळुरूतील बीएमटीसी (बंगळुरू महानगर परिवहन महामंडळ) बससेवेची अचानक पाहणी केली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा दर्जा आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्यांनी तब्बल दोन तास सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास केला.
आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला होता. सायंकाळी 7.10 ते रात्री 9.10 या वेळेत त्यांनी बंगळुरूतील 10 हून अधिक बीएमटीसी बसमधून प्रवास केला. प्रत्येक बसमध्ये तिकीट काढून त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या पाहणीदरम्यान एका गंभीर प्रकाराची दखल घेत मंत्र्यांनी बीएमटीसीच्या एका बसचा चालक आणि कंडक्टरला निलंबित करण्याचे आदेश दिले. फन वर्ल्ड बसथांब्यावर एका प्रवाशाने उतरण्यासाठी इशारा करूनही बस न थांबवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
पाहणीदरम्यान मंत्र्यांनाही सामान्य प्रवाशांप्रमाणेच एका अडचणीचा सामना करावा लागला. हेब्बळ ते नागशेट्टीहळ्ळी या मार्गावरील बसमध्ये तिकीटासाठी त्यांनी 100 रुपयांची नोट दिली असता, वाहकाने सुट्टे पैसे नसल्याचे सांगितले. सुट्टे पैसे नसतील तर बसमधून उतरावे लागेल, असे त्याने सांगितले. समोरचा प्रवासी राज्याचा परिवहन मंत्री असल्याची कल्पना नसल्याने वाहकाने नियमांनुसारच वागणूक दिली.
Karnataka transport minister @byrathi_suresh unaware of fare revisions from last year https://t.co/l3Qdx0t18X
— Chaitanya Deep (@seadeep42) July 12, 2026



























































