
मुलीचा फोटो काढताना पाय घसरून उल्हास नदीत पडलेल्या पित्याचा बुडून मृत्यू झाला. अभिजित जाधव असे मृत व्यक्तीचे नाव असून ते वांगणीजवळील डोणे गावचे रहिवासी होते.
अभिजित जाधव हे त्यांची मुलगी व अन्य पाच सहकाऱ्यांसह शनिवारी रात्री शेलूजवळील खारीक फार्म परिसरात मुक्कामी होते. आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फिरण्याचा आनंद घेण्यासाठी ते उल्हास नदी परिसरात गेले होते. यावेळी मुलीचा फोटो काढण्यासाठी नदीकाठी असलेल्या दगडावर उभे राहून फोटो काढत असताना त्यांचा पाय घसरला आणि पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने ते बुडाले. काही तासांच्या शोधानंतर अभिजित यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.






























































