आईस्क्रीमचा बहाणा करून मुलीचा केला विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आईस्क्रीमचा बहाणा करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गोरेगाव येथे घडली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पीडित मुलगी उत्तर मुंबईत राहते. मंगळवारी रात्री ती गोरेगाव पश्चिम येथील एका सुपर मार्ध्यर्ते आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. आईस्क्रीम घेतल्यानंतर तिने पैसे देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने तिला दुकानात बोलावले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी नकोसे कृत्य केले. आरोपीने मुलीला धमकीदेखील दिली. त्या घटनेने मुलगी प्रचंड घाबरली. तिने याची माहिती तिच्या आईला सांगितली. तिच्या आईने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच एकाला पोलिसांनी अटक केली.