लहानपणापासूनच्या मित्राकडून मित्राची हत्या; तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवंडीच्या शिवाजीनगर येथे लहानपणापासूनच्या मित्रानेच त्याच्या मित्राची पोटात चाकू खुपसून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या अन्य दोघांनाही गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले.

बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रियाज शेख (24) हा इमारत क्र. 34-बी समोरील पाण्याच्या टाकीजवळ बसला असताना आरोपी व त्याचे दोन साथीदार तेथे आले. आरोपीने रियाजशी वाद घालत त्यांच्या पोटात चाकू खुपसला. गंभीर जखमी झालेल्या रियाजला तत्काळ राजावाडी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रियाजचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात आरोपी व मयत हे लहानपणापासूनचे मित्र असून त्यांच्यात काwटुंबिक कारणांमुळे पूर्वीपासून वाद असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपीने मयतास 1,500 रुपये उसने दिले होते. बुधवारी रात्री रियाज इमारतीसमोरील पाण्याच्या टाकीजवळ बसलेला असताना उधारीवरून तसेच काwटुंबिक कारणांमुळे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर मुख्य आरोपीने धारदार शस्त्राने रियाजच्या पोटात वार केला. या गुह्यात दोन आरोपींनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा करून पसार झालेल्या तिन्ही आरोपींना गुन्हे शाखा युनिट -6 च्या पथकाने अटक केली आहे.