
कॉक्रोज जनता पार्टीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे जंतरमंतर मैदानावर गोंधळाचे वातावरण झाले आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मात्र तरी देखील जंतरमंतरवरून हटण्यास आंदोलकांनी नकार देत संसदेवर धडकणारच असा इशारा सरकारला दिला आहे.
पोलिसांनी CJP च्या संसद मोर्चाला परवानगी दिली नसल्याचे म्हटले आहे. तर आंदोलकांनी आम्ही काहीही झाले तर संसदेवर जाणारच असे आंदोलकांनी सांगितले आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने जाऊ शकले नाही तर आंदोलक मेट्रो मार्गाने जाऊ शकतात त्यामुळे पोलिसांनी जंतरमंतर च्या जवळची पाच मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली आहेत.
जमावबंदी लागू
आंदोलकांना रोखण्यासाठी नवी दिल्लीत कलम 163 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत नवी दिल्लीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.





























































