दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र आणि रुग्णालयाला वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश, सोनम वांगचुक प्रकरणी मंगळवारी सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्याच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकार आणि सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे सर्व वैद्यकीय अहवाल आणि उपचारांशी संबंधित रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी दुपारी १२:३० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, सोनम वांगचुक हे जंतरमंतरवर उपोषणाला बसले होते. सुमारे २० दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून हटवत जबरदस्तीने सफदरजंग या सरकारी रुग्णालयात दाखल केले.

या कारवाईला आव्हान देत वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंगमो यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात यावे आणि त्यांना हवते ते डॉक्टर निवडू द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.