अमरावतीमध्ये दोन तरुणांची निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिह्यातील वलगाव येथे मध्यरात्री एका भीषण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वलगाव बसस्थानक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. संजोग जोशी (वय 24) आणि ऋतिक पंडित (वय 25) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस फरार आरोपींच्या मागावर आहेत. ऐन तारुण्यात मुलांची अशाप्रकारे हत्या झाल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.