वांगचूक यांच्या पत्नीला केसाला धरून ट्रकमधून बाहेर काढले, कॉक्रोच जनता पार्टीचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील धडक मोर्चात सोनम वांगचूक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली जे. आंगमो या देखील सहभागी झाल्या होत्या. कॉक्रोज जनता पार्टीच्या समर्थकांसोबत ट्रकमधून त्या संसदेच्या दिशेने निघाल्या होत्या त्यावेळी पोलिसांनी तो ट्रक अडवला व आंगमो यांना केसाला धरून ट्रकबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे.

”काल दिल्ली पोलिसांनी सर्व सीमा पार केल्या आहेत. त्यांनी आमच्या मुलांची डोकी फोडली, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, त्यांना फरफटत नेलं. वांगचूक सरांच्या पत्नीला त्यांनी केसाला धरून ट्रकमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला’, असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी केला आहे.

तसेच जो पर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत जंतरमंतरवर आंदोलन सुरुच राहणार असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.