भगर, साबुदाण्याच्या किमती वाढल्या; उपवासाचा फराळ महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशी आणि श्रावण महिन्यांमध्ये बहुतांश भाविक उपवास करतात, परंतु आता ऐन आषाढ आणि श्रावण महिन्याच्या तोंडावर यंदा भाविकांना महागाईची मोठी झळ बसणार आहे. फराळासाठी लागणाऱ्या पदार्थांमध्ये मोठी दरवाढ झाल्याने उपवासाचा फराळ यंदा महाग झाला आहे. महागाईने आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपवासाचा फराळ करणेही महाग झाले आहे.

यंदा 25 जुलैला आषाढी एकादशी असून उपवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. या उपवासाच्या फराळाची मोठी जय्यत तयारी घरोघरी केली जाते. आषाढीनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात दर सोमवारी अनेक जण उपवास करतात.