फ्रान्समध्ये पर्यावरण मंत्र्यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कीटकनाशकांच्या वापरास मंजुरी मिळाल्याने नाराज झालेल्या फ्रान्सच्या पर्यावरण मंत्री मोनिक बारबू यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. कीटकनाशके, मधमाशा आणि इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांना हानिकारक आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. फ्रान्सच्या संसदेने मंगळवारी हे विधेयक सादर केले होते.