
पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 26 दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. हे उपोषण आता त्यांनी मागे घेतले आहे. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
मेदान्ता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले. देशभरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि निर्माण होऊ शकणारा हिंसाचाराचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एक्सवर पोस्ट करत वांगचुक यांनी याबाबत माहिती दिली.

देशभरातील विविध पक्षांच्या सुमारे 65 खासदारांचे पत्र आणि केंद्र सरकारसोबत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मी हे उपोषण मागे घेत आहे. देशात कोणताही हिंसाचार होऊ नये, यासाठी सर्वांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे, असे सोनम वांगचुक म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वांगचुक यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.
Just now in the presence of Union Ministers Sh. JP Nadda, Dr. Jitendra Singh and the senior leaders of Apex Body of Leh Ladakh I finally broke my fast after 26 days. Earlier 65 members of parliament from different political parties had visited or signed letters urging me to break… pic.twitter.com/RFCet7Oksy
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 23, 2026
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. कारण त्यांचा जीव देशासाठी मौल्यवान आहे. वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहील. वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण आणि दिल्ली पोलिसांनी ज्या निर्दयपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्या विद्यार्थ्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे अभिजीत दिपके यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटले.
सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे, CJP चे आंदोलन सुरूच राहणार; अभिजीत दिपके यांची माहिती pic.twitter.com/0ZtLszBasG
— Saamana Online (@SaamanaOnline) July 24, 2026
दरम्यान, देशभरातील विद्यार्थी आंदोलनानंतर सरकारची भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशीरा एक व्हिडीओ जारी केला. तरुणांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्यांना सोडले जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच शुक्रवारी मंत्रिमंडळामध्ये पेपरफुटीविरोधात कठोर निर्णय घेतला जाईल आणि यासाठी संसदेत विधेयक आणले जाईल, असे मोदी म्हणाले. त्यानंतर काही वेळात वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले.
View this post on Instagram






























































