
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या संशयावरून आक्रमक झालेल्या जमावाने एका तरुणाची लाठय़ाकाठय़ा आणि दगडांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना झारखंडमधील चतरा जिल्ह्यात घडली.
चतरा जिह्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुलगी सापडल्यानंतर तिला संबंधित तरुणाने आपल्या घरात डांबून ठेवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला. यानंतर गावातील 150 लोकांचा जमाव तरुणाच्या घरासमोर जमा झाला. त्यांनी त्याच्यावर लाठय़ाकाठय़ा आणि दगडांनी प्राणघातक हल्ला केला. मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी 56 जमावाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.





























































