
अरुणाचल प्रदेशातील शी योमी येथे बुधवारी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल इतकी होती. शी योमी जिल्ह्याच्या उत्तर-ईशान्येस 60 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
अरुणाचल प्रदेशातील ईशान्य प्रदेश अत्यंत संवेदनशील भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. गेल्या काही महिन्यांत येथे अनेक भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. काही आठवड्यांपूर्वीच, अप्पर सियांग जिल्ह्याला 5.1 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता.


























































