किरबेट येथे गवारेड्यांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या भाताचे नुकसान, कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर किरबेटचे शेतकरी नाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथे तब्बल 14 शेतकऱ्यांच्या भात शेतीचे गवारेड्यांनी नुकसान केले आहे. गवारेड्यांनी लावलेले भात खाऊन व तुडवून टाकले आहे.

भात लावणीच्या कालावधीमध्ये पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना पंपाच्या साहाय्याने भात शेती लावावी लागली. हाताशी आलेली शेती गवारेड्यांनी खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच कृषी कर्मचारी केव्हातरी गावामध्ये येतात आणि शेतकऱ्यांना शेती विषयी समाधानकारक सल्ला देत नाहीत त्यामुळे येथील शेतकरी नाराज आहेत.

राजेंद्र जायगडे,सदानंद चाळके,पांडुरंग जायगडे, आनंत पांचाळ,शरद कांबळे, आत्माराम कांबळे, अशोक कांबळे,सुनील अंकुशराव, संजय जायगडे, संजय कांबळे,प्रकाश जायगडे,महेश जायगडे, प्रकाश सुर्वे,महेंद्र लाखन या सर्व शेतकऱ्यांचे गवारेड्यांनी भाताचे नुकसान केले आहे.वन खात्याने गवारेड्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी किरबेट येथील शेतकरी करत आहेत.