
येत्या 17 ते 23 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या आघाडीच्या खेळाडूंना मानांकन जाहीर करण्यात आले असून त्यामुळे यजमान संघाच्या पदकाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधूला महिला एकेरीत नववे मानांकन, तर पुरुष दुहेरीतील स्टार जोडी सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना पाचवे मानांकन मिळाले आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन हा 14वा मानांकित, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिषा क्रॅस्टो या जोडीला 15वे मानांकन देण्यात आले आहे जागतिक क्रमवारीच्या आधारे मिळालेल्या या मानांकनामुळे सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये तुलनेने अव्वल खेळाडूंशी सामना टाळण्याचा लाभ हिंदुस्थानच्या खेळाडूंना मिळू शकतो.




























































