
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा एका पाकिस्तानी पत्रकाराने केल्याने खळबळ उडाली आहे. पत्रकाराच्या या दाव्यानंतर इम्रान यांचा पक्ष पीटीआयने सरकारला इशारा दिला आहे. आमचे 20 लाखांहून अधिक समर्थक रस्त्यावर उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. पाकिस्तानच्या तरुणांमधील हा रोष सध्याच्या लष्करी राजवटीला नियंत्रित करणे अशक्य होईल, असे खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री आणि पीटीआय नेते सोहेल आफ्रिदी यांनी पाक सरकारला आणि लष्करी राजवटीला इशारा दिला आहे.
अमेरिकास्थित पाकिस्तानी ज्येष्ठ पत्रकार वजाहत सईद खान यांनी आपल्या युटयूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा खळबळजनक दावा केला आहे. रावळपिंडी येथील पाक लष्कराच्या मुख्यालयातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांच्याबाबतीत ही गंभीर शंका व्यक्त केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.



























































