
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र पर्यटनासाठी नागरिकांची नेहमीच हाऊसफुल्ल गर्दी असते. वाघोबाचे दर्शन हे वाहनांमधून घ्यायचे असते असा नियम असताना काही पर्यटकांनी वाहनांमधून उतरून वाघोबासोबत फोटो, व्हिडीओ आणि सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन्यजीव प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा चंद्रपूर ते मोहर्ली हा मार्ग 20 किलो मिटरचा आहे. या मार्गावर काही उपद्रवी नागरिकांनी या मार्गाने भ्रमंती केली. भ्रमंती सुरू असतानाच वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे व्याघ्र दर्शनाने उपद्रवी नागरिकांना आपला मोह आवरता आला नाही. काही वाहनातील नागरिक खाली उतरून वाघांसोबत सेल्फी करण्याचा प्रत्यन करून लागले तर काहींनी जवळून खाली उतरून बघण्याचा प्रयत्न केला.




























































