हिंदुस्थानी हवाई दलाची ‘पॉवर’ आणखी वाढणार, 1.15 लाख कोटींच्या प्रकल्पातून 210 विमाने खरेदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात आणखी 60 बहुउद्देशीय वाहतूक विमाने आणि 150 प्रशिक्षणार्थी विमाने अशी एकूण 210 विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. या विमान खरेदीचे पत्र संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे. यासाठी जवळपास 1 लाख 15 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

मोठय़ा प्रकल्पांमुळे केवळ मोठय़ा कंपन्यानाच नाही, तर सुटय़ा भागांची निर्मिती करणाऱया हजारो लघु आणि मध्यम उद्योगांना कोटय़वधींची कंत्राटे मिळणार आहेत. ‘एचएएल’चे या क्षेत्रात वर्चस्व आहे, तर ‘टाटा’ आणि ‘महिंद्रा’सारख्या खासगी क्षेत्रातील कंपन्याही स्पर्धेत आहेत. हिंदुस्थानी संरक्षणनिर्मिती क्षेत्राला नवी ओळख मिळणार आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी टाटा समूह, महिंद्रा समूह आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स या तीन कंपन्यांमध्ये चुरस पाहायला मिळेल.