
जुळवण्याच्या फंदात एका तरुणाने तयार केलेली एक्सेल शीट चांगलीच व्हायरल झाली आहे. विकास लोहटिया असे या तरुणाचे नाव असून, त्याने या शीटमध्ये त्याची मुलींबरोबर सुरू असणारी बोलणी, मुलीच्या कुटुंबीयांचा प्रतिसाद आदी गोष्टी नमूद केल्या होत्या. अखेर एक वर्ष आणि 55 स्थळांनंतर विकासला योग्य जोडीदार मिळाला आहे. दोघेही 2027 मध्ये बंधनात अडकणार आहेत. नऊ महिने मुलीशी संवाद साधल्यानंतर कॉम्पॅटाबिलिटी मॅच झाल्याचे त्याने म्हटले आहे. गुरुग्राम येथील ही तरुणी शिक्षिका आहे. हा व्हिडिओ @thevikkchapte या इंस्टा आयडीवरून शेयर करण्यात आला आहे. एकाने EXCEL-लेंट हसबेन्ड मटेरीअल तर अन्य एकाने लग्न जुळवण्यासाठी एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे? अशी कमेंट केली आहे.


























































