पीओपी मूर्तींचे विसर्जन तूर्तास नदी, तलाव, समुद्रात करता येणार नाही, हायकोर्टाने निकाल राखून ठेवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीओपी मूर्तींचे विसर्जन तसेच सीपीसीबीने बदललेल्या भूमिकेविरोधात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर आज सुनावणी पूर्ण झाली. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने या याचिकांवरील निकाल राखून ठेवला असून 9 जून 2025 च्या आदेशाप्रमाणे न्यायालयाच्या परवानगीशिवाय तूर्तास कोणत्याच पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करता येणार नाही, असे यावेळी स्पष्ट केले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे पीओपी मूर्ती बसवणाऱया गणेश मंडळांसमोर पेच निर्माण झाला आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी हायकोर्टात अॅड. रोनिता भट्टाचार्य यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.