
-
डोशाच्या पिठापासून ते तव्याच्या तापमानापर्यंत काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरीच रेस्टॉरंटसारखा पातळ, कुरकुरीत आणि सोनेरी डोसा बनवता येतो.
-
डोशासाठी ३ कप तांदूळ, १ कप उडीद डाळ आणि थोडे मेथीदाणे हे प्रमाण उत्तम मानले जाते. हॉटेलसारखा डोसा कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडे पोहेसुद्धा मिसळतात.
-
पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावे. मध्यम आचेवर गरम केलेल्या लोखंडी तव्यावर डोसा मध्यभागापासून गोलाकार फिरवत शक्य तितका पातळ पसरावा.






























































