
आपण वर्ष 2047पर्यंत विकसित हिंदुस्थानाचे लक्ष्य ठेवून पुढे जात आहोत. आपले विद्यार्थी देश निर्माते आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वर्तमान आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत सिंधू जल करार निलंबित करणे शेतकऱ्यांसाठी एक निर्णायक पाऊल आहे, असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा करार निलंबित करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.
देशाच्या 80च्या स्वातंत्र्यदिच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू यांनी देशाला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी विविध मुद्दय़ांवर विचार मांडत देशाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. यासोबतच विद्यार्थ्यांसंदर्भात भाष्य करत त्यांनी देशात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनांची दखल घेतल्याचे भाषणातून दिसले.



























































