
ओमानमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याने एकाचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस एअर विंगने अल हिम्मा गव्हर्नरेटमधून दोन जखमींना निझवा रुग्णालयात नेण्यासाठी मोहीम राबवली.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, वाहनात बिघाड झाल्यामुळे ते सुलतान सईद बिन तैमूर ते रस्त्यावर घसरल्याची प्राथमिक माहिती मिळते. अपघाताची माहिती मिळताच रॉयल ओमान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

























































