
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील एका गावात दोघां मित्रानी नात्यातीलच एका सात वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार केला. याबाबत मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने त्यांना जाब विचारला. त्यानंतर तिला देखील या तरुणांनी लाथा बुक्क्याने मारहाण केली. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून शुक्रवारी युसूफ वडगाव पोलिसात पोक्सो व अत्याच्याराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.
या गावातील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या बालिकेवर तिच्याच नात्यातील दोन नराधमांनी गेल्या चार महिन्यांपासून अनेकदा अत्याचार केला. मे महिन्यात पहिल्यांदा आरोपींनी या बालिकेला कशाचे तरी आमिष दाखवून तीला घरी बोलावून घेतले. तिथे दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वारंवार त्या दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पिडीत बालिकेच्या आईने दिली. त्यानंतर पीडितेच्या आईने युसूफवडगाव पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.
या प्रकरणातील दोघां मित्रांना पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी अटक केली असून दोघांपैकी एकाचे वय 19 वर्षे आहे. त्याला केज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत त्याला तीन दिवस पोलीस कोठाडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर दुसरा आरोपी 15 वर्षांचा आहे.























































