पाकड्यांची टरकली! सिंधू पाणी कराराबाबत पाकिस्तानी मंत्र्याच्या मनातील भीती व्यक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान हिंदुस्थानविरोधात कितीही कुरघोड्या करत असला तरीही त्यांच्या मनातील भीती आता स्पष्टपणे दिसून येत आहे.पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी अलीकडेच दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली. हिंदुस्थानने सिंधू पाणी करार निलंबित किंवा स्थगित ठेवण्याच्या निर्णयावर आणि दक्षिण आशियातील हिंदुस्थानच्या भौगोलिक आणि सामरिक स्थानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांच्या वक्तव्यांमुळे प्रादेशिक राजकारण आणि पाण्याचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इक्बाल यांनी इशारा दिला आहे की, गरजेच्या वेळी पाणी रोखून हिंदुस्थान त्याचा शस्त्र म्हणून वापर करू शकतो, हा धोका आता पाकिस्तानसमोर आहे.

पाकिस्तानी मंत्री अहसान इक्बाल यांनी म्हटले आहे की, सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर हिंदुस्थान पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करू शकतो. त्यांनी दक्षिण आशियातील हिंदुस्थानच्या मध्यवर्ती भूमिकेवर जोर दिला आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी ती महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले.

अहसान इक्बाल म्हणाले की, हिंदुस्थान हा एक किनारपट्टीचा देश आहे, जिथून नद्या पाकिस्तानात वाहतात. या भौगोलिक फायद्याचा लाभ घेऊन, हिंदुस्थान पाकिस्तानविरुद्ध पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे संपूर्ण विधान असे होते की, पाकिस्तानसमोर आता एक स्पष्ट धोका आहे की, गरज पडल्यास पाणीपुरवठा थांबवण्यासाठी हिंदुस्थान पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करू शकतो.

एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत हा करार केला जाणार नाही. इक्बाल यांच्या विधानावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, इस्लामाबाद पाणीपुरवठ्याबद्दल चिंतित आहे, कारण कृषी आणि अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर या नद्यांवर अवलंबून आहेत.त्यामुळे आता पाकड्यांची भीती स्पष्ट होत आहे.