
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी रविवारपासून (२३ ऑगस्ट) कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मध्ये खेळवली जाईल. सामन्याच्या एक दिवस आधी, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघाच्या कामगिरीबाबात प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवणे हे त्यांचे ध्येय नाही, तर भारतीय संघासाठी ट्रॉफी जिंकणे हे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही काळापासून टीम इंडियाच्या कसोटी कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः संघाच्या कामगिरीबद्दल आणि गंभीरच्या प्रशिक्षणाबद्दल टीका झाली आहे. त्यावर गंभीरने प्रत्युत्तर दिले. माझं काम ट्रॉफी जिंकणं आहे, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणं नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.
आपण टीका किंवा सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा फारसा विचार करत नाही. आपले संपूर्ण लक्ष भारतीय संघाला यशस्वी करणे आणि ट्रॉफी जिंकण्यावर आहे. गंभीर म्हणाला, जिंकणे हे माझे काम आहे. मला त्याचीच पर्वा आहे आणि त्यावरच माझा विश्वास आहे. लाईक्स आणि व्ह्यूज मिळवणे हे माझे काम नाही,असे त्याने स्पष्ट केले.


























































