
पहिल्या कसोटीत झालेल्या लाजीरवाण्या पराभवाचा बदला घेत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर डावाने विजय मिळवला. क्वीन्सलँडमधील ग्रेट बॅरियर रीफ अरेना, मॅके येथे रंगलेला सामना ऑस्ट्रेलियाने 1 डाव आणि 51 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचे श्रेय वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला जाते. त्याने पहिल्या डावात 6, तर दुसऱ्या डावात 4 अशा एकूण 10 विकेट्स घेतल्या. तर कर्मधार पॅट कमिन्सने 6, हेझलवूडने 3 आणि नाथन लायनने 3 विकेटस घेत त्याला उत्तम साथ दिली. मिचेल स्टार्क सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पहिल्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 65 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर दिवस अखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 बाद 165 अशी झाली होती. दुसऱ्या दिवशी कॅमरून ग्रीन आणि नाथन लायन या जोडीने आणखी 45 धावांची भर घातली आणि ऑस्ट्रेलियाला 200 पार पोहोचवले. ग्रीन 67 धावांवर बाद झाला, तर लायन 32 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून शोरिफूल इस्लामने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही बांगलादेशचे फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. मिचेल स्टार्क, कमिन्स आणि लायनच्या गोलंदाजीपुढे बांगलादेशने लोटांगण घातले. बांगलादेशचा दुसरा डावही 38.3 षटकांमध्ये 95 धावांमध्ये आटोपला. शांतोने सर्वाधिक 31, तर मुशफिकूर रहीम याने 29 धावांचे योगदान दिले. या व्यतिरिक्त 9 फलंदाज करत दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. त्यामुळे बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.
Mitchell Starc continued to wreak havoc against Bangladesh in Mackay to register a ten-wicket haul 💥
📝: https://t.co/PQuffFjsha pic.twitter.com/tdYjEcjkqB
— ICC (@ICC) August 23, 2026
सर्वात कमी चेंडूत निकाल लागलेले कसोटी सामने –
- हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केपटाऊन, 2024 – 642 चेंडू
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, 1932 – 656 चेंडू
- वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिड्जटाऊन, 2025 – 672 चेंडू
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश, मॅके, 2026 – 750 चेंडू
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मॅन्चेस्टर, 1888 – 788 चेंडू


























































