IND vs SL – बोल्ड होताच श्रीलंकेच्या खेळाडूने डिवचले, यशस्वीही भिडला; डोळ्यात डोळे घातले, हेल्मेटने टक्कर दिली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात रविवारपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरू झाला. कोलंबोत सुरू असलेल्या या लढतीत हिंदुस्थानचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने पहिली 10 षटकं व्यवस्थित खेळून काढली. अकराव्या षटकामध्ये ही जोडी फुटला. आधी केएल राहुल 18 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर 17व्या षटकात यशस्वीही बाद झाला.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो याने यशस्वीच्या यष्ट्या उडवल्या आणि यानंतर आक्रमक सेलिब्रिशन केले. यावेळी फर्नांडो आणि यशस्वीमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. पवेलियनकडे निघालेला यशस्वी माघारी फिरला आणि फर्नांडोजवळ पोहोचत त्याने त्याच्या डोळ्यात डोळे घातले, हेल्मेटने टक्कर दिली. यामुळे मैदानावर काही काळ वातावरण चांगलेच तापले होते.

नेमकं काय घडलं?

केएल राहुल बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल यांनी सर्व सूत्र हाती घेतली. यशस्वीने आक्रमक खेळी करत श्रीलंकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सतराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फर्नांडो याने त्याला बाद केले. यशस्वीने 53 चेंडूत 45 धावा फटकावल्या. या खेळी दरम्यान त्याने 9 चौकार ठोकले. यशस्वीला बाद केल्यानंतर फर्नांडोने आक्रमक सेलिब्रेशन केले. हे पाहून पवेलियनकडे निघालेला यशस्वी माघारी फिरला आणि दोघांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. यावेळी यशस्वीने हेल्मेटने टक्करही दिली. यामुळे वातावरण चांगलेच तापले. अखेर श्रीलंकेच्या कर्णधाराने मधस्थी केली आणि यशस्वीला दूर घेऊन गेला. त्यानंतरही यशस्वीच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता. याचा व्हिडीओही समोर आला आहे.

पडिक्कल-गिलचे अर्धशतक

दरम्यान, यशस्वी बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि शुभमन गिल यांनी मोर्चा सांभाळत शतकीय भागिदारी केली. देवदत्तने पहिल्या कसोटीतील फॉर्म कायम राखत अर्धशतक ठोकले, तर यशस्वीनेही 50 धावांचा आकडा पार केला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हिंदुस्थानच्या 51 षटकांमध्ये 2 बाद 185 धावा झाल्या होत्या.

AUS vs BAN – याला म्हणतात बदला… ऑस्ट्रेलियाचा बांगलादेशवर डावाने विजय; 750 चेंडूत संपला सामना, स्टार्कच्या 10 विकेट्स