
जळगाव जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून सुरतच्या दिशेने जाणाऱ्या सर्वसामान्यांच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. कन्नड घाटात झालेल्या या भीषण अपघातात 59 प्रवाशांचा जीव अगदी थोडक्यात वाचला आहे. दरी आणि प्रवशांचा जीव यांच्यामध्ये संरक्षक कठाडा आल्याने मोठा अपघात टळला.
मिळालेल्या माहितीनुसरा, रविवारी, 23 ऑगस्ट दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरहून एसटीबस सुरतच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. बसमध्ये जवळपास 59 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, कन्नड घाटात बस आली असता एका धोकादायक वळणावर अचानक स्टीअरिंमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चालकाच बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस आहे त्याच वेगात थेट दरीच्या दिशेने गेली आणि संरक्षक कठड्याला जोरदार आदळली. जर संरक्षक कठडा नसता तर, बस थेट दरीत कोसळून मोठा अपघात झाला असता.
जळगाव जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून सुरतच्या दिशेने जाणाऱ्या सर्वसामान्यांच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. कन्नड घाटात झालेल्या या भीषण अपघातात 59 प्रवाशांचा जीव अगदी थोडक्यात वाचला आहे. #jalgaonnews #stbus #accident pic.twitter.com/U9l0ieq8Y6
— Saamana Online (@SaamanaOnline) August 23, 2026
कठड्यावर बस आदळताच चालकाच्या बाजून सर्व प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारत आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. बसचा नेमका अपघात कशामुळे झाला, याचा शोध घेतला जाईल.

























































