‘लायब्ररी जंक्शन’ला रेल्वे प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चर्चगेट रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आलेल्या ‘लायब्ररी जंक्शन’ला रेल्वे प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळाला आहे. रोजच्या धावपळीतही खास वेळ काढून प्रवासी ‘लायब्ररी जंक्शन’कडे वळू लागले आहेत. मागील दोन महिन्यांत या वाचनालयासाठी तब्बल 1190 वाचकांनी नोंदणी केली आहे. ‘प्रोजेक्ट मुंबई’च्या सहकार्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. 5 जूनला हे वाचनालय वाचक प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत 1190 वाचकांनी नोंदणी केली आहे.