आधी पाण्याची व्यवस्था करा, नंतर इमारती उभारा; शिवसेनेची पालिका, सिडको प्रशासनाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐन पावसाळ्यात खारघर, कळंबोली, तळोजा आणि कामोठेवासीयांना पाणी टंचाईचे भीषण चटके बसत आहे. उन्हाळ्यात तर पाण्याची समस्या आणखीन गंभीर होते. त्यामुळे आधी पाण्याची व्यवस्था करा आणि त्यानंतरच नवीन इमारतीच्या बांधकामांना परवानगी द्या, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी पालिका, सिडको प्रशासनाकडे केली आहे.

सिडको आणि पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने लक्ष घालावे. या समस्येचे मूळ, उपलब्ध जलस्रोत, पाणी वितरण व्यवस्था तसेच वाढत्या लोकसंख्येच्या तुल नेत भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याबाबत सिडको आणि पनवेल महापालिकेने सविस्तर श्वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणीही भरत पाटील यांनी केली आहे.

पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत घटक असल्याने शासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच सिडको आणि पनवेल महापालिकेकडून पाणीपुरवठ्याबाबत अधिकृत श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यासाठी पाठपुरावा करावा.

भरत पाटील, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना