Chandrapur News – राजुरा न्यायालयासमोर गोळीबार; एकाचा मृत्यू, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील न्यायालयासमोर सोमवारी गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्तीने विनोद जाधव यांच्यावर तीन राउंड फायर करून पलायन केले. या गोळीबारात जाधव यांच्या डोक्याला गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.

पोलिसांनी जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, या हत्येतील आरोपी करण मेकलवार (22) आणि करण दीपक बाविसकर (24) यांनी स्वतःहून राजुरा पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली असून, पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र ताब्यात घेतले आहे.