ममता बॅनर्जी यांच्या पुतणीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरात आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, हा धक्का राजकीय नसून कुटुंबातील एका व्यक्तीच्या अचानक जाण्याने बसला आहे. ममता बॅनर्जी यांची पुतणी वृष्टी मुखर्जी (28) तिच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदणासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

TOI च्या वृत्तानुसार, वृष्टीचे वडील निहार मुखर्जी हे ममता बॅनर्जी यांचे चुलत भाऊ आणि तृणमूल काँग्रेसचे प्रादेशिक नेते आहेत. मार्च 2023 मधील कॅच-फॉर-जॉब्ज या प्रकरणामुळे वृष्टी मुखर्जीच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला. कारण याच प्रकरणाशी संबंधित एका न्यायालयीन निर्णयामुळे तिला नोकली गमवावी लागली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशनानुसार बोलपूर युपर प्रायमरी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी पदावरून बडतर्फ करण्यात आलं होतं. या बडतर्फ कर्मचाऱ्यांमध्ये वृष्टीचाही समावेश होता. तेव्हापासून ती नैराश्यात होती आणि तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. वृष्टीचा मृतदेह तिच्या वीरभूम जिल्ह्यातील दुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.