Duleep Trophy – कर्णधार ईशान किशनची ऐतिहासिक कामगिरी, 13 वर्षांचा दुष्काळ संपवला; संघाची फायनलमध्ये धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडिमयवर ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यामध्ये Duleep Trophy 2026 ची पहिली सेमी फायलन रंगली. या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखालील ईस्ट झोन संघाने सेंट्रल झोनचा 4 विकेटने पराभव करत रुबाबात फायनलमध्ये धडक मारली आहे. विशेष म्हणजे तब्बल 13 वर्षांनी ईस्ट झोनला फायनलमध्ये धडक मारण्यासाठी वाट पाहावी लागली होती. अखेर त्यांची ही मोठी प्रतिक्षा संपुष्टात आली आहे.

प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल झोनचा पहिला डाव 266 धावांवर आटोपला, ज्यामध्ये रिंकू सिंहने सर्वाधिक 60 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ईस्ट झोननेही आपल्या पहिल्या डावात बरोबरी साधत 266 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने 81 चेंडूत 92 धावांची तडाखेबंद खेळी केली, तर अभिमन्यू ईश्वरनने 69 धावांचे योगदान दिले. यानंतर, मुकेश कुमारच्या भेदक माऱ्यापुढे (44 धावांत 4 विकेट्स) सेंट्रल झोनचा दुसरा डाव केवळ 158 धावांवर गडगडला. 159 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ईस्ट झोनच्या सुरुवातीला पडझड झाली.

संघाची पडझड झाली मात्र, वैभव सूर्यवंशी (40) आणि कर्णधार ईशान किशन यांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ईशान किशनने नाबाद 39 धावांची संयमी खेळी करत संघाला 39.3 षटकांत विजय मिळवून दिला. सेंट्रल झोनकडून हर्ष दुबेने दोन्ही डावात मिळून चमकदार गोलंदाजी करत एकूण 8 विकेट्स पटकावल्या, पण संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. आता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 6 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा सामना नॉर्थ झोन आणि साउथ झोन यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. या सामन्यात एकूण 7 विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार ‘प्लेयर ऑफ द मैच’ ठरला.