एसी चालू ठेवून कारमध्ये झोपला, रेस्टॉरंट मॅनेजरचा गुदमरून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसी चालू ठेवून कारमध्ये झोपलेल्या रेस्टॉरंट मॅनेजरचा गुदमरून मृत्यू झाला. मुरली (42) असे मयत मॅनेजरचे नाव आहे. तामिळनाडूच्या राणीपेट जिल्ह्यातील वल्लाजापेट येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, मुरलीची पत्नी प्रिया हिने वल्लाजापेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, मुरली गेल्या 15 वर्षांपासून आपल्या कुटुंबासह चेन्नईमध्ये राहत होता. मुरली आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वल्लाजापेटला गेला होता. तिथे तो एसी चालू ठेवून कारमध्ये झोपी गेला. बराच वेळ मुरली कारमधून बाहेर न आल्याने त्याच्या वडिलांना संशय आला. त्यांनी कार उघडली असता, मुरली आत बेशुद्ध अवस्थेत आढळला.

वडिलांनी तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा एसी चालू असताना एक्झॉस्ट पाईपमधून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू गाडीत शिरला, ज्यामुळे गुदमरून मुरलीचा मृत्यू झाला.