
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थान ‘अ’ संघाविरुद्धच्या दोन चारदिवसीय आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. पीटर हँड्सकॉम्बचा ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याच्या कसोटी कारकीर्दीला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. या संघात ब्रेंडन डॉगेट आणि झाय रिचर्डसन यांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ या महिन्याच्या अखेरीस चारदिवसीय सामन्यांसाठी पुदुचेरीला जाणार आहे, त्यानंतर तीन 50 षटकांचे सामने होतील.
चारदिवसीय संघ ः ब्रेंडन डॉगेट, जॅक एडवर्ड्स, पीटर हँड्सकॉम्ब, सॅम हार्पर, लियाम हॅचर, पॅम्पबेल केलवे, सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकस्वीनी, टॉड मर्फी, फर्गस ओ’नील, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, कोरी रोचिओली, जेसन संघा, लियाम स्कॉट.
एकदिवसीय संघ ः महली बियर्डमन, निखिल चौधरी, बेन ड्वार्शियस, जॅक एडवर्ड्स, अॅरॉन हार्डी, स्पेन्सर जॉन्सन, सॅम कॉन्स्टास, नॅथन मॅकस्वीनी, टॉड मर्फी, मिच ओवेन, जोश फिलिप, तनवीर संघा, लियाम स्कॉट, लॅकलॅन शॉ.





























































